IMPIMP
When the power went out during the program, the Lankans attacked the power company official during the program itself When the power went out during the program, the Lankans attacked the power company official during the program itself

कार्यक्रम सुरू असताना वीज गेली, लंकेंनी थेट कार्यक्रमातच वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला झापलं

नगर : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवली आणि विद्यमान खासदाराला पराभवाचं पाणी पाजलं. यानंतर आता निलेश लंके यांचा सध्या ठिकठिकाणी सत्कार समारंभ सुरू आहेत. अशातच नगरच्या केडगाव उपनगरात मंगळवारी रात्री असाच एक कार्यक्रम सुरू होता. अन् त्यावेळी अचानक वीज गेली. त्यावेळी निलेश लंके यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून झापलं.

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

नगरच्या केडगाव उपनगरात मंगळवारी रात्री असाच एक कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात वीज पुरवठा खंडित झाला. यावर नागरिकांनी तक्रार केली की, तुमचा कार्यक्रम सुरू असताना जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यावर खासदार लंके यांनी लगेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करीत आहात? नेमक्या माझ्याच कार्यक्रमाच्यावेळी वीज पुरवठा का खंडित होतो? असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा..मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ? 

जर पाच मिनिटांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तुमच्या कार्यालयात येऊन हा कार्यक्रम घेऊ असा सज्जड इशारा खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर खरोखरच पाच मिनिटांत वीज पुरवठा सुरळीत झाला आणि उपस्थितांनी जल्लोष केला.

READ ALSO :

हेही वाचा..लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू 

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

हेही वाचा…“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार 

हेही वाचा..“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

Leave a Reply