दूध दरवाढीवरून राज्यात सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपातर्फे दूधाला योग्य भाव देण्यात यावा यासाठी आंदोलन करत आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखी देखील आंदोलन करण्यात आले. आता राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला व दूध दरवाढीबरोबर विलासराव देशमुख यांनी काय भूमिका घेतली होती त्याबाबत सांगितले.
राजू शेट्टी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हणाले की, 2 जुलै 2007 रात्रीचे दोन वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरिकेत आहे. उद्या आर आर यांच्याशी दूध दरासंदर्भात चर्चा करून आंदोलन मागे घ्या, मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि त्यांनी निर्णय घेतला सुध्दा. साहेब आज तुमची अनुपस्थिती जाणवते.
काल विलासारव देशमुख यांच्या 8व्या पुण्यतिथी निमित्ताने ही पोस्ट शेअर करत राजू शेट्टी यांनी त्यांना विनम्र अभिवादन दिले.