IMPIMP
When we form the government, we will conduct a detailed inquiry When we form the government, we will conduct a detailed inquiry

“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

मुंबई : मुंबईत पावसाळा सुरू होण्याच्या आधीच कोस्टर रोडला गळती सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दोन महिन्यांपुर्वीच कोस्टर रोड मुंबईकरांच्या सेवेत उघडण्यात आला होता. अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झालीय. त्यावरून आता ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी 

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते तर मुंबई कोस्टर रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पुर्णपणे तयार झाला असता आणि तो नागरिकांसाठी खुला झाला असता. परंतु भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला. खर्च वाढवण्याचं काम केलं. फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्घाटनाच्या तारखा बदलत राहिल्या. त्यावेळेस निर्दर्शनासही आणले होते. परंतु तेही फक्त एका लेनसाठी सुरू होते.

हेही वाचा…“आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही, विधान परिषदनिवडणुक लढणार “, मनसेने महायुतीला दिला कडक इशारा

शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपुर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आली. १ लेन जी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत खुली असते. मग आम्हाला नवीन टाईमलाईन देण्यात आली. आधी मार्च नंतर एप्रिल नंतर मे पर्यंत संपुर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय. परंतु नागरिकांना कोस्टर रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देणार का ? असा सवालही ठाकरेंनी केलाय. तसेच शिवाय जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू. तेव्हा हा विलंब का झाला ? याचा तपशीलवार चौकशी करू. असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा…विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ? 

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू 

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप