मुंबई : ज्या ज्या ठिकाणी आमचं बळ आहे त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ताकद उभी करुन भाजपच्या बाहेर राहतील आणि राष्ट्रावादीसोबत येतील. अशी शक्यता असलेल्या काही महापालिका आहेत, काही नगरपालिका आहेत.
या ठिकाणी पक्षांतर कायद्याची बाधा न येता स्वतंत्र गट स्थापन करणे शक्य होणार असेल तर अनेकांनी त्याची तयारी माझ्याकडे दाखवली आहे. नगरसेवकांची तयारी असेल तर जळगाव जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल अशा ठिकाणी हा प्रयोग पुढील कालखंडात करु असं हि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.
काल मुंबईत एका कार्यक्रमात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यातच आता भाजपचे आणखी काही आमदार महाविकास आघाडी सरकारच्या गळाला शक्यता वर्तवली जात आहे, कारण आता मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करून एक नवीनच गौप्यस्फोट केला आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते.
भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे या चर्चा बंद होतील, आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
Read Also ;
खासदार सुनील तटकरेंविरोधात शिवसेनेकडून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखलhttps://t.co/OcJjm51Jtn @SunilTatkare @iAditiTatkare #yogeshkadam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020