IMPIMP
Who will get a chance to consider 11 names for 05 Legislative Council seats from BJP Who will get a chance to consider 11 names for 05 Legislative Council seats from BJP

भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रात येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक होणार आहे. यामध्ये भाजपचे चार आमदार सहज निवडून येणार आहेत. यातच महायुतीमधील कोणता पक्ष किती जागा लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु भाजप पाचवा उमेदवार देखील देण्याच्या तयारीत आहे. यातच पाच जागांसाठी भाजपमध्ये तब्बल ११ जणांची नावं सध्या चर्चेत आली आहेत.

हेही वाचा…लिप्टमध्ये ठाकरे अन् फडणवीसांची काय चर्चा झाली ? प्रत्यक्षदर्शी भुजबळांनी सांगितली खरी हकिकत 

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये ५ जागांसाठी ११ जणांची नावं चर्चेत आली आहेत. भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना संधी मिळणार आहे. तर या पाच जागांमध्ये एका महिला नेत्यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. महादेव जानकर वगळता जागांसाठी तब्बल दहा नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा..टायगर अभी जिंदा है..! चंद्रपुर जिल्ह्यात बडे नेते लागले विधानसभेच्या तयारीला

या दहा नावांमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नावांचाही भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर विचार करत आहे. यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री परिणय फुके, आमदार निलय नाईक, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप नेते अमित गोरखे, माधवी नाईक यांचीही नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, आता ११ जागांसाठी महायुतीत काय फॉर्म्यला ठरणार. तेपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपला शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील सामावून घेण्याची गरज आहे. कारण त्यांच्या जागा याठिकाणी कमी झाल्या तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

READ ALSO :

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

हेही वाचा..“अजित पवारांनी अन्याय केला का नाही ? “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

हेही वाचा..“चंद्रकांत पाटलांनी आम्हाला चॉकलेट दिले असले तरी जे हलाहल पचवून शिवसेना उभी” 

Leave a Reply