उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या वाढली आहे.त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणांवरचा ताण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे यातच आता आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे अख्खे कुटुंबच कोरोना पाॅझीटीव्ह निघाल्याने प्रशासन हादररून गेले आहे.
भाजपचे सरचिटणीस तथा विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. काही दिवसांपासून ठाकूर यांच्या मातोश्री आजारी होत्या. त्यामुळे मंगळवारी ठाकूर यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची अॅन्टीजन टेस्ट करून घेतली. कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला आहे.मात्र आमदार ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती चांगली आहे.
सोशल मीडियावर केली पोस्ट
कोरोनाची लागण झाल्यानंतर सुजितसिंह ठाकूर यांनी स्वतः याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना दिली. मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही, त्याबद्दल क्षमस्व असल्याचे सांगत कृपया काही महत्अवाचे काम असल्यास एसएमएसद्वारे कळवावे, मी उपलब्ध असेल असे आवाहनही त्यांनी केले.
मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन https://t.co/1xgKaz0gis
— Sujitsingh Thakur (@sujit_thakurmlc) August 9, 2020