नागपूर : राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूरसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नगरखेड पंचायत समितीत भाजपने बाजी मारली आहे.
संत वचन, शेरोशायरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फटाकेबाजी
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. याआधी नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ती भाजपने हिसकावली आहे.
माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही – नितीन गडकरी
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार तर, पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात उतरले होते. उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण या निवडणुकीतील निकालावरच विधान परिषद निवडणुकीतील विजय-पराभवाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती.
Read Also :
- धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दणदणीत विजय; धरती देवरे यांच्या झेंडा फडकला
- अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
- जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाचा झेंडा फडकणार?
- पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा राज्य सरकारला घरचा आहेर!
- अजितदादा, पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्या, अन्यथा…- अमोल मिटकरी