IMPIMP
Vidhan Parished Election Vidhan Parished Election

विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटणार ? राज्यात मोठा राजकीय भुंकप येण्याची शक्यता

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त १२ वा उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवल्याने राज्यात विधान परिषदेची निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे पाच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे दोन तर कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. परंतु उद्धव ठाकरे गटाकडून काल मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता या निवडणुकीत क्रास व्होटिंगमुळे कुणाचा गेम होणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण मागच्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना क्रास व्होटिंग फटका बसला होता. त्यामुळे या निवडणुकीत आता सगळ्याच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.

विधान परिषदेतील ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यासाठी येत्या १२ जूलैला निवडणुकीत होत आहे. यामध्ये भाजपचे आमदार रमेश पाटील, रामराव पाटील, विजय गिरकर, निलय नाईक आणि महादेव जानकर यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाचे अनिल परब , शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा कायंदे, कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, अजित पवार गटाचे अब्दुल्लाह दुर्रानी, कॉंग्रेसचेच वजाहत मिर्झा आणि शेकापचे जयंत पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. यातून प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बाकींचा पत्ता कट करण्यात आला आहे.

यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्ज तर कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे. परंतु काही आमदारांचे निधन झाले तर काही खासदार झाले आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत फक्त २७४ आमदारांची संख्या आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा विजयी कोटा हा २३ मते ठरवण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी आता २३ मतांची आवश्यकता असणार आहे.

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

यातच सध्या भाजपकडे १०३ आमदार असून त्यांचे पाच आमदार सहज निवडून येतात. शिवसेना शिंदे गटाकडे ३८ मते असून त्यांचे दोन आमदार तर अजित पवारांकडे ३९ मते असून त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने एक उमेदवार उभा केला असून त्यांच्याकडे ३६ मते असून त्यांचा तो उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त १५ मत असून त्यांना अजून ८ मतांची गरज भासणार आहे. दुसऱ्या बाजूला शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु शरद पवार गटाकडे फक्त १४ मत असून त्यांना विजयासाठी आणखी ९ मतांची गरज भासणार आहे.

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असतांनाही क्रोस व्होटिंग झाल्याने कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी देखील क्रोस व्होटिंग होण्याची भीती अधिक व्यक्त करण्यात येत आहे. यातच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी आता मतांची तजवीज करण्यास सुरूवात केली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी भाजपचे प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांसाठी शरद पवारांना देखील काही मत वळवावी लागणार आहेत. भाजप , कॉंग्रेसकडे अतिरिक्त मत असून ती मत आता कुणाच्या पारड्यात पडणार तेपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

Leave a Reply