पुणे : महाविकास आघाडी सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादीने आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. आता राष्ट्रवादी जिंकण्याच्या तयारीत लागली आहे कारण पिंपरी चिंचवड ची जबाबदारी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना मिळण्याची शक्यता आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक,पदाधिकारी यांची बैठक शिरूरचे खासदार डॉ .अमोल कोल्हे यांनी आज शुक्रवारी घेतली यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला .
पक्षाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ‘आपल्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी सोपवली आहे का ?, असे पत्रकारांनी विचारले असता ‘मला अजूनही लोक नेता कमी अभिनेता अधिक मानतात. अभिनेता हा नेहमी चित्रपटात काय आहे? हे सांगत नाही. त्यामुळे हा तर ट्रेलर आहे, पुढे काय होते ते पाहू, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला. शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शहरात लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमुखी नेतृत्व राहिले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. भारतीय जनता पक्षाकडे पक्षाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला उध्वस्त केला . शहरात सर्वांगीण विकास करूनही, अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार नाराज आहेत. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्यावर सोपविणार का, याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.
Read Also :
होय, शरद पवार यांनी सिरममध्ये लस घेतली ! पण…https://t.co/sx2IFzDFbc#SharadPawar #CoronaVaccine #Serum #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020