IMPIMP
Will 'seven MPs' come together for the development of Pune Will 'seven MPs' come together for the development of Pune

“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय?

पुणे : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून निवडणुक लढवलेल्या सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. मात्र तरी देखील सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. त्यानंतर एकट्या पुणे जिल्ह्याला एकूण सात खासदार मिळाले. यातच आता या सर्व खासदारांनी आपला राजकीय मतभेद बाजूला ठेऊन काम केल्यास पुणे जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. अशी भावना आता जिल्ह्यातील मांडू लागले आहेत.

सध्या पुणे जिल्ह्यात मुरलीधर मोहोळ म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत. मावळात श्रीरंग बारणे, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, बारामतीतच सुप्रिया सुळे, तर राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार, मेधा कुलकर्णी म्हणून खासदार आहेत. यातच आता या सर्व खासदारांनी संसदेत एकदाच आवाज उठवला तर अनेक प्रश्न सुटले जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

विशेष म्हणजे, ‘फ्युचर सिटी’ आणि पुणे जिल्ह्याची औद्योगिक व आयटी क्षेत्रात जागतिक ओळख प्राप्त झालेल्या पिंपरी-चिंचवडशी संबंधित केंद्र सरकारकडील प्रलंबित प्रश्न प्रामुख्याने मार्गी लागले पाहिजेत. सुमारे ३० लाख पिंपरी-चिंचवडकरांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा..चिखलात माखलेले पाय पटोलेंनी कार्यकर्त्यांकडुन घेतले धुवून, व्हिडीओ व्हायरल 

पुणे जिल्ह्यात आता लोकसभा आणि राज्यसभेत पुरेसे प्रतिनिधित्व आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र यांच्यातील उत्तम समन्वयामुळे पुण्याचा रिंगरोड, मेट्रोच्या पायाभूत सुविधांची जलद गतीने पूर्तता आणि यांसारख्या प्रलंबित आणि ओढल्या गेलेल्या समस्या सोडवणे अपेक्षित आहे. पुरंदर विमानतळाचे बांधकाम, भूजल पुनर्भरण आणि संवर्धन आणि हरित पट्ट्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय उपक्रमाची नितांत गरज आहे. या सर्व खासदारांनी पक्षाच्या सीमारेषा बाजूला ठेवून चांगल्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा आहे.

यासह पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ६ लाख नागरिकांवर प्रभाव करणारा ‘रेड झोन’ संदर्भात सकारात्मक ‘फोकस’ करण्याची आवश्यकता आहे. तसेच, खासदारांनी बेरोजगारी, टाळेबंदी, शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी असंतोष यासारख्या समस्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, कचरा व्यवस्थापन ही शहरातील एक महत्त्वाची समस्या आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

हेही वाचा..मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ? 

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

हेही वाचा..“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला 

Leave a Reply