राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थिची भूमिका घेतली.
पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सिल्वर ओकवर बोलावलं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे
काल संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार याना शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक घेतले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे मिटवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे मात्र सिल्व्हर ओकवर झालेल्या या भेटीनंतर पार्थ पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.