IMPIMP
vidhansabha mumbai vidhansabha mumbai

विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ?

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान पार पडलं. यानंतर या निवडणुकाचा निकाल आज सोमवारी जाहीर होणार आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.

हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा 

मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि कॉंग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज. मो. अभ्यंकर रिंगणात आहेत. त्याआधी मतमोजणीसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली.

हेही वाचा..”मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

शनिवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिराला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उपस्थित होते. नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याने याच ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्ह्याधिकारी गोविंद बोडके, रत्नागिरीचे जिल्ह्याधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदूर्गचे जिल्ह्याधिकारी किशोर तावडे, रायगडचे किशन जावळे, मुंबई शहराचे जिल्ह्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर सहय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते.

READ ALSO :

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

हेही वाचा…“जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय” 

हेही वाचा..“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही” 

Leave a Reply