IMPIMP
Will there be a law in the case of paper leakage? Rohit Pawar's question Will there be a law in the case of paper leakage? Rohit Pawar's question

पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ्या दिवसाची सुरूवात पेपर फुटीसंदर्भातील चर्चेवरून झाली. राज्यात मागील काही वर्षांपासून अनेक परिक्षांमध्ये पेपर फोडण्यात आले. यासंदर्भात कायदा करणार का ? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असा इशाराच त्यांनी दिला.

हेही वाचा..“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही” 

सभागृहात रोहित पवार म्हणाले की, सर्व कायदे असतानाही सुद्धा गुन्हे घडत असतात. त्या कायद्यात सुधार करायचा असतो. व्यवस्था बदलण्याकरता कायद्यात सुधार करायचा असतो. राज्यातील युवकांच्या मनात गैरविश्वास निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं, यासाठी संघटित गुन्हेगारी काम करणं अशी शंका आहे. असा गैरविश्वास निर्माण करण्याऱ्यांची चौकशी करणार का ? असा सवाल आशिष शेलार अन् रोहित पवारांनी केला.

हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा 

यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुलांमध्ये अंग्रेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. १ लाख लोकांना रोजगार दिले आहेत. फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असा इशाराच त्यांनी दिला. तर अभिमन्यू पवार यांच्याबरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं. त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की कायदा आणू. याच अधिवेशनात आपण कायदा करणार आहोत. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पेपर फुटीप्रकरणावरून विरोधकांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकारच्या विरोधात बॅनरबाजी देखील केली.

READ ALSO :

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

हेही वाचा…“जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय” 

 

Leave a Reply