IMPIMP
Will you allow Jayant Patal into Congress? Nana Patole gave this answer Will you allow Jayant Patal into Congress? Nana Patole gave this answer

जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्याल का ? नाना पटोलेंनी दिलं हे उत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जून रोजी लागणार आहे. दोन्ही बाजूंनी आपलीच सत्ता स्थापन होईल असा दावा केला जात आहे. तर राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करतांना दिसत आहेत. यातच जयंत पाटील ०४ जून नंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा अजित पवार गटाने केला आहे. त्यावर जयंत पाटलांना तुम्ही कॉंग्रेसमध्ये घ्याल का ? यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं भाष्य केलं आहे.

हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल 

अजित पवार गटातील सुरज चव्हाण यांच्यासह शिंदे गटातील संजय शिरसाट, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा केला आहे. त्यावर नाना पटोले यांना प्रश्न विचारले असता नाना पटोले म्हणाले की, देशामध्ये सध्या परिवर्तनाची एक लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षातील हायकमांड यावर जो निर्णय घेतील. त्या निर्णयाचं आम्ही सर्वजण समर्थन करू. अशी सुचक प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार 

दरम्यान, मेहबुब शेख यांच्या दाव्यानंतर सुरज चव्हाण यांनी देखील मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा कॉंग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली असून त्यांचा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे येत्या ०४ जूननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट रिकामा होणार आहे. तिकडचे अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करतील असंही सुरज चव्हाण यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा, तर मराठवाड्यात गुरांना कोरडा चारही नाही” 

हेही वाचा…जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, अर्धा शरद पवार गट रिकामा होणार ? 

हेही वाचा…“RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं”, रोहित पवारांचा गंभीर आरोप 

हेही वाचा…जुनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा”