यंदाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर नागपूरचं आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी राहण्यास काही आमदार विरोध करत असल्याचंही बोललं जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे नागपूरला अधिवेशन घेण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा मुंबईवरुन आणि अन्य जिल्ह्यांमधून नागपूरला हलवाली लागते. कोरोना संकटात इतक्या लोकांची व्यवस्था कशी होणार? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, 7 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं. तसंच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली.