IMPIMP
ambadas danve (2) ambadas danve (2)

“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे

मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात भाजप आमदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित असलेले अंबादास दानवे आता उद्यापासून सभागृहात दिसणार आहेत. अंबादास दानवे यांच्या निलंबनात दोन दिवसाची कपात केली असून गूरूवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषेदत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी अशी मागणी यावेळी चंद्रकांत पाटलांनी केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर केला. त्यानुसार आता दानवे यांना दिलासा मिळाला असून उद्यापासून ते कामकाजात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर झाला. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं नाही. मी दिलगिरी व्यक्त केली होतीच. त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घालवले आहेत. उद्यापासून मी सभागृहात जाईन. तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे. असंही दानवेंनी म्हटलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

Leave a Reply