अमरावती : पोलिस कॉन्सेटबलवर हात उगारल्याप्रकरणी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. अमरावती जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता भाजप नेत्यांनी यशोमती ठाकूर यांना टार्गेट करण्यास सुरुवात केलीय. त्यावर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल, अशा शब्दात ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. आपलं राजकीय आयुष्य संपवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पण आपण माघार घेणार नाही. भाजपशी आपला लढा सुरुच राहील, असा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्या न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय. ‘मी स्वत: वकील आहे. त्यामुळं आपण सदैव न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला आहे. शेवटी विजय सत्याचाच होईल’, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
काय आहे प्रकरण ?
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Read Also
…तर ही परिस्थिती ओढवली नसती, पुण्याच्या महापौरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवारhttps://t.co/telinGuuoU#MurlidharMohol #SupriyaSule #NCP #BJP @mohol_murlidhar @supriya_sule
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020