IMPIMP
You fight on Shiv Sena symbol, I fight on lotus symbol Amol Shinde challenges Kishore Patal You fight on Shiv Sena symbol, I fight on lotus symbol Amol Shinde challenges Kishore Patal

“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान

जळगाव : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आता स्थानिक नेत्यांनी तयारी करण्यास सुरूवात केलीय. यामध्ये आमदार किशो पाटील, अमोल शिंदे, दिलीप वाघ व वैशाली सुर्यवंशी यांनी याकडे विशेष लक्ष घातलं आहे. मात्र यामध्ये महायुतीतील शिवसेनेचे किशोर पाटील व भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यातील विकोपाला गेलेला वाद यामुळे महायुतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. सध्या या दोघांमध्ये राजकीय वणवा चांगलाच फेटला आहे.

हेही वाचा..चिखलात माखलेले पाय पटोलेंनी कार्यकर्त्यांकडुन घेतले धुवून, व्हिडीओ व्हायरल 

किशोर पाटलांनी अमोल शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर मी जर मातोश्रीवर पाय ठेवला असेल तर त्या बाबतीत आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मातोश्रीवरील सीसीसीव्ही फुटेज अथवा माझे त्या दिवसाचे मोबाईल लोकेशन एवढेच, एवढेच नाही तर आपण सत्तेतील आमदार आहात. माझा उन्मेष पाटील व करण पवार यांच्याशी संपर्क जाल्याचा सीडीआर रिपोर्ट या सर्वांपैकी फक्त एक पुरावा सादर करावा. मी उभ्या राजकीय आयुष्यातून संन्यास घेईल. त्यासाठी आपल्याला १ आठवडा मुदत देतो. अन्यथा आपण सिद्ध न केल्यास आपण राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घ्यावा . असं आवाहन देखील त्यांनी दिलंय.

हेही वाचा…“फडणवीसांनी मला या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलं “, नरेश म्हस्केंनी सांगितला विधान परिषदेचा किस्सा 

अमोल शिंदे यांनी किशोर पाटलांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपल्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उघड-उघड विरोधी उमेदवार करण पवार यांचे काम केले. याबाबत सर्व पुरावे वरिष्ठांना सादर केले आहेतच. एवढेच नव्हे तर आपण स्वत: च्या गावात अंतुर्लीमध्ये स्मिता ताईंना मायनस ठेऊन करण पवार यांना मताधिक्य मिळवून दिले. असा आरोपही त्यांनी लावला.

यातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील अमोल शिंदे यांनी किशोर पाटलांना आव्हान दिलंय. आपण आपल्या वरिष्ठांना सांगावे व पाचोरा-भडगाव विधानसभेत मैत्रीपुर्ण लढत होण्याची विनंती करावी. म्हणजेच तुम्ही शिवसेना या चिन्हावर लढावे व मी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढेल, अन् जर ही हिमंत नसेल तर मी ही अपक्ष लढतो. तुम्ही पण अपक्ष लढा. होऊन जाऊ द्या. दुध का दूध, पाणी का पाणी. असेही त्यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

हेही वाचा..मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ? 

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

हेही वाचा..“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला 

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

Leave a Reply