भाजपा सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती त्यांनी स्वत:च दिली. अमळनेरहून जळगावच्या दिशेने जात असताना खडसेंच्या गाडीला अपघात झाला. धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं प्रसंगावधान राखून क्षणात वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. एकनाथ खडसे सुखरुप असून अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून ते दुसर्या वाहनाने जळगावकडे रवाना झाले.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020
दरम्यान एकनाथ खडसे दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनतर त्यांनी जळगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यलयात प्रवेश अनेक कामांना सुरुवात देखील केली आहे. मात्र एकनाथ खडसे याना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते पद मिळेल याबाबत अजूनही संभ्रम आहे.