IMPIMP
Your place is special in my life and will always be Pritam Munde's special post for Raksha Khadse Your place is special in my life and will always be Pritam Munde's special post for Raksha Khadse

“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट

मुंबई : रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदी.३.० सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांना युवा व क्रिडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिलीय. रक्षा खडसे यांनी आजच आपल्या पदाचा कारभार स्विकारला आहे. यातच आता माजी खासदार प्रितम मुंडे यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

रक्षा खडसे आणि प्रितम मुंडे मागच्या सरकारच्या काळात सोबतच खासदार होत्या. अनेकदा त्या संसदेत एकाच जागी बसत होत्या. मात्र प्रितम मुंडे यांच्या जागी भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट दिल्याने त्यांनी लोकसभेत जाण्याची संधी मिळाली नाही. अशातच त्यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी एक पोस्ट लिहित तुझं स्थआन माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहिल असं प्रतिम मुंडे यांनी म्हटलंय.

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

प्रितम मुंडे यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी…

10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ; आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या.

१० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!

१० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

READ ALSO :

हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी 

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी” 

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर