मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी मुंबई महापालिकेने कोविड केंद्र हे शिवसेना नेत्यांच्या कमाईचे साधन बनल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याचा एक पुरावा देखील सोमय्या यांनी जारी केल्याचा दावा त्यांच्या सचिव कार्यालयाकडून प्रसिद्धपत्रकातून करण्यात आला आहे.
“फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला”; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
“किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीला गेल्या काही महिन्यात मुंबई महापालिकेने कोविड केंद्र आणि कोविड संबंधी सुविधांचा पुरवठा करण्यासाठी 27 वेगनेगळे ऑर्डर्स व त्याच्या समोर 1.97 कोटींचे पेमेंट केल्याचे पुरावे आज किरीट सोमय्या यांनी रुजू केले. अशाच पद्धतीने मुंबईतल्या आणखीन एका कोविड केंद्रासंबंधी एका बेनामी कंपनीला 12 कोटी रुपयांचे पेमेंट मुंबई महापालिकेने केले आहे. या संबंधीचे पेमेंट व अधिक पुरावे पुढच्या आठवड्यात किरीट सोमैय्या रुजू करणार”, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
“महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना गांजाडीया व ज्या शिवीगाळ करायच्या असतील त्या कराव्या. परंतू कोट्यवधी रुपयांचे कोविड केंद्राचे पेमेंट स्वत: किंवा परिवाराच्या कंपनीत मिळाले. त्यासंबंधी स्पष्टता आधी करावी”, असंदेखील त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. “महापौरांनी मुंबई महापालिकेचा पैसा स्वत:च्या कंपनीत टाकला हे मुंबईकरांसाठी शर्मेची बाब आहे”, अशी टीका सोमय्या यांनी केली.
"COVID की कमाई"
शिवसेना मुंबई महापौर किशोरी पेडणेकर…. यांचा किश कॉर्पोरेट इंडिया कंपनीला मुंबई महानगरपालिकेचा वरळी विभागाने कोविड केंद्र/कार्यासाठी ₹1.97 कोटींचे ऑर्डर्स/पेमेंट केले (यादी, पुरावे सोबत देत आहे)
काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, पेमेंट चे पुरावे मी प्रस्तुत करणार pic.twitter.com/6BLZNOlZqg
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2022
विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी याबाबत व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओत सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना किस कॉर्पोरेट कंपनीच्या खात्यात किती कमाई जमा झालीय ते उघड करावे, असं सोमय्या म्हणाले आहेत. “मुंबई कोविड केंद्राची कमाई किशोरी पेडणेकर यांच्या कंपनीच्या खात्यात. किस कॉर्पोरेट कंपनी किशोरी पेडणेकर यांनी बनवली. मुंबई महापालिकेच्या वरळी विभागाने 27 ऑर्डर, 1 कोटी 97 लाख पेमेंट किशोरी पेडणेकर यांचे किस कॉर्पोरेट कंपनीच्या खात्यात जमा केले आहेत. महापौर महोदया आपल्या परिवाराच्या कंपनीच्या खात्यात कोविडची महापालिकेतून आलेली किती कमाई जमा झाली आहे?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
Read also:
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसली; औरंगाबादमध्ये आणखी दोन नव्या शाखांच उद्घाटन
- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
- अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे
- अहमदनगरच्या पालकमंत्री पदी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर..
- पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…