औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप अनिश्चितता असली तरीही मनसे मात्र स्थानिक पातळीवर कामाला लागली आहे. घराघरात मनसे असे ब्रीदवाक्य घेत औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणी करत आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात औरंगाबाद मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता दिसून येत होती.
प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव; भाजप नेते आवाज उठवणार?
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत बदल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांमधील मतभेद अधिक स्पष्ट दिसून येत होते. मात्र नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमार्फतही पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीचे काम वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
“फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला”; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन मजबुतीसाठी शहरातील विविध भागात शाखा उघडण्यात येत आहेत. वार्ड क्रमांक 19 प्रगती कॉलनी व वार्ड क्रमांक 49 घाटी-भडकल गेट, येथील शाखेचे उदघाटन राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाअध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. वार्ड क्रमांक 19 प्रगती कॉलनीचे शाखा अध्यक्ष विजय गंगावणे, शाखा उपाध्यक्ष शुभम राउत, शाखा सचिव संदीप शेजवळ, सदस्य सचिन साळवे, मनोज सुरडकर, अरुण जगताप, प्रमोद मोरे, यांची तर वार्ड क्रमांक 49 घाटी-भडकल गेट येथील शाखा अध्यक्ष मंगेश दामोदर, शाखा उपाध्यक्ष संतोष वाडेकर, शाखा सचिव प्रभाकर सुरडकर, सदस्य अमोल शिंदे, विकी पाटील, साहेब जहागीरदार, सुनील जाधव, यांची निवड करण्यात आली.
Read also:
- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
- अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे
- अहमदनगरच्या पालकमंत्री पदी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर..
- पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
- दिलासादायक बातमी: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटली, गेल्या दोन दिवसात १० टक्यांनी घट