मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मध्यंतरी ‘ईडी’च्या कचाट्यात सापडलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. ठाकरे सरकारकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अशाप्रकारे एखाद्या आमदरासाठी विशेष निर्णय घेण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असेल. याशिवाय, ठाकरे सरकारकडून सरनाईक यांच्या छाबय्या विहंग या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेशही दिला जाऊ शकतो. त्यामुळे ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर अचानक इतके मेहरबान का झाले आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तसेच असा निर्णय झाल्यास भाजपचे नेते शांत बसणार का, हेदेखील पाहावे लागेल.
मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावत विरुद्धही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत झालेल्या कारवाईने मोठे वादळ उठले होते. ईडीने प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता व कार्यालयांवर छापे टाकले होते. ‘टॉप्स सिक्युरिटी’ घोटाळ्याच्या प्रकरणातही प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप झाले होते. याप्रकरणात प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांचीही चौकशी करण्यात आली होती. प्रताप सरनाईक यांच्या कथित घोटाळ्यांविरोधात आवाज उठवण्यात भाजप नेते किरीट सोमय्या हे आघाडीवर होते.
युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याची विनंती केली होती. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असे त्यांनी म्हटले होते.
Read also:
- “मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र
- शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; शशिकांत शिंदेंचे शिवसेना आमदाराला प्रत्यूत्तर
- शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नसणार; कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रवक्ते नवाब मलिकांची घोषणा
- शरद पवार पंतप्रधान कधी होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर कधी पडणार? हेही सांगा – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे? पवारांच्या बैठकीवर भाजप नेत्याचा टोला