मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकूण २२ संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेतली. या बैठकीवरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकरावर निशाणा साधला. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फरार, पण उपमुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
As always CM Uddhav ji is absconding. But where is deputy CM? In what capacity @PawarSpeaks had called meeting to resolve ST worker's strike issue? Does he have any constitutional authority ? Or this is just another eyewash for ST workers? pic.twitter.com/yuiQJ2AZTo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 10, 2022
भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले की, नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फरार आहेत. पण उपमुख्यमंत्री कुठे आहेत? कोणत्या अधिकाराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलावली होती? त्याला काही घटनात्मक अधिकार आहे का? की एसटी कामगारांसाठी ही आणखी एक डोळ्यांची पालवी आहे? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले.
गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
दरम्यान शरद पवार यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब, विभागाचे अधिकारी आणि कृती समितीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एसटीचा संप मिटविण्याबाबत कृती समितीने पुढाकार घेतला आहे. सरकारच्या निर्णयात ज्या काही त्रुटी आहेत , त्या समितीने दाखवून दिल्या आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?