मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिका म्हणजे कमाईचे साधन आहे, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पालिका म्हणजे कमाईचे साधन आहे. कोविडमध्ये यांनी जी लूट केली त्याचे घोटाळे मी आता मांडणार आहे असं म्हणत आज मी पुराव्यासह 15 कोटी यशवंत जाधव यांनी कशापद्धतीने एजंटला दिले हे सांगत आहे अशी माहिती देत त्यांनी शिवसेना नेत्यावर आरोप केले. सोमय्या म्हणाले की, 15 कोटी तुकड्या-तुकड्यांनी दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लि. च्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. 1 रूपयांचे शेअर यांनी 500 रुपयांनी घेतले. यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, यामिनी जाधव 2 कोटी, निखिल जाधव 50 लाख, यतीन जाधव 50 लाख, Shauru ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात 3 कोटी रुपये, Cressida traders च्या खात्यात 2 कोटी, सुनंदा मोहिते यांच्या खात्यात 5 कोटी असे एकूण 15 कोटी यशवंत जाधव यांनी आपल्या आणि आपल्या नातेवाईक यांच्या खात्यात वळवले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
माजी खासदार श्री. किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद. https://t.co/HgyQ7lxMMh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 11, 2022
पुढे सोमय्या म्हणाले की, आम्ही याबाबत सर्व एजन्सींना तक्रार करणार आहोत. कोविडच्या सर्व कंत्राटाची चौकशी झाली पाहिजे. मागील एक महिन्यांपासून मी माहिती अधिकाराखाली माहिती मिळवत आहे पण तिकडे सांगितले जात आहे की किरीट सोमय्या यांना माहिती देऊ नका असाही आरोप त्यांनी केला आहे.
Read also:
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला