कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. महाविकास आघाडीमध्ये उभी फूट या निवडणुकीदरम्यान पडली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज बंटी पाटील, आमदार विनय कोरे यांनी वेगळी मोट बांधली होती. त्यांना आव्हान म्हणून शिवसेनेने देखील आपला विरोधी पॅनल घोषित केला होता.
कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
आता निकालानंतर विरोधी गटाने सत्तारूढ गटाला थेट धक्का दिल्याने सगळं वातावरण फिरलं आहे. सत्तारूढ गटातील ३ उमेदवारांना थेट पराभवाला सामोरे जावे लागल्याने आता सत्तारूढ गटातही उभी फूट पडली आहे. विनय कोरे यांनी सत्तारूढ गटाला इशारा दिला आहे की प्रकाश आवाडेंच्या पराभवाचे उट्टे मी काढणारच, असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
त्यावरून आता थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का देण्याचे मनसुबे काहींनी रचले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी करून बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाच शह देण्याचा प्रयत्न सध्या सुरु असल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात रंगली आहे.
गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
मंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणातील उत्तराधिकारी भैया माने यांना मानले जाते. त्यांच्या विरोधातील नवख्या उमेदवाराला पडलेली मते व त्यांचेही घटलेले मताधिक्य पाहता या जागेवरही धक्का देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून राजकारणातून झाल्याचे दिसते आहे. पतसंस्था गटात तर शहरासह करवीर तालुक्यात सत्तारूढमधूनच विरोधी मतांसाठी फोन केल्याचे काही पुरावेही नेत्यांना मिळाले आहेत. शहरातील या गटाची यंत्रणा तर ‘वाड्या’वरून हलली आहे. काही माजी नगरसेवक मतदान केंद्राबाहेर थांबून या ‘जोडण्या’ लावत होते. त्यामुळे आता थेट विरोधी गट हसन मुश्रीफांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
Read also:
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे
- शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
- .यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते