जळगाव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील वादाच्या प्रकरणी कोथरुड (पुणे) पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात केलेल्या तपासणीत तब्बल एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करून पुण्याला नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
या कारवाईवर अद्यापही पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी ऍड विजय भास्करराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारी नुसार कोथरूड पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या समवेत नीलेश भोईटे यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोव्यात काँग्रेसची महाविकास आघाडीतून एक्झिट? खासदार संजय राऊतांनी सांगितलं नकाराच कारण
या गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात जळगावातील पाच संशयितांची दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी महापालिकेत तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जावून चौकशी करत काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
या प्रकरणात एक टेम्पोभरून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गाडीभर कागदपत्रांमध्ये नेमके काय आहे ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता हा चौकशीचा भाग असल्याने अधिकाऱ्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. या मात्र तपासणीमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत मुख्य तक्रारदार विजय भास्कर पाटील यांनी सांगितले की, भरपूर आणि खूप मोठे पुरावे पोलिसांना छापेमारीत मिळाले आहेत. भोईटे गटाच्या घरात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जुने रेकॉर्ड सापडल्याची माझी माहिती आहे. सगळं रेकॉर्ड घेऊन हे पथक आज पुणे येथे रवाना झाले आहे.
Read also:
- शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
- .यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते
- गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
- गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
- खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !