मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची गेल्या २५, ३० वर्षांपासून असलेली युती २०१९ साली तुटली. यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाषा भारतीय जनता पक्षाकडून अनेकदा करण्यात आली होती, मात्र तसं काहीही महाराष्ट्रात झालेलं नाही.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आता भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने भाजपला एक मोलाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेईल असं वाटत नाही. त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं. यावेळी त्यांनी भाजपाला वाटत होतं की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. पण भाजपाचा अंदाज चुकला, असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोव्यात काँग्रेसची महाविकास आघाडीतून एक्झिट? खासदार संजय राऊतांनी सांगितलं नकाराच कारण
आठवले म्हणाले, की जो अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणे शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. महाराष्ट्राच्या उज्वल विकासासाठी त्यांनी काम करावं. भाजपाला वाटत होत की तीन पक्ष कधी एकत्र येणार नाही मात्र तसं काही झालं आहे .आता भाजपाने मोठं मन करावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करण्यासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा विचार करावा.
कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
आठवले यावेळी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या स्थितीवर देखील बोलले. आठवले म्हणाले की कोरोनामुळे देशात ५ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी पूर्णतः सरकारची आहे मात्र तितकीच ती आपली देखील आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री प्रयत्न करत आहेत. देशातील एकूण रूग्णांपैकी २५ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घ्या असा सल्ला देखील आठवलेंनी दिला आहे.
Read also:
- राज्यातील पहिल्या उर्दू घराची ५ महिन्यांतच दयनीय अवस्था; चव्हाणांनी जनतेच्या ८ कोटींवर पाणी फेरले?
- यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते
- गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
- गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
- खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !