नांदेड : राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकीक असलेले नांदेड जिल्ह्याचे उर्दू घराचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उदघाटन केले होते. या उदघाटनासाठी मोठी गर्दी जमली होती आणि एक मोठा असा कार्यक्रम देखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, पाच महिन्यांमध्येच उर्दू घराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उर्दू भाषेचे जतन व्हावे यासाठी हे उर्दू घर बांधण्यात आले होते. यासाठी तब्ब्ल ८ कोटींचा खर्च देखील करण्यात आला होता.
भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला पदाचा राजीनामा
८ कोटींचा खर्च आला असताना देखील फक्त ६ महिन्यांमध्ये उर्दू घराची अवस्था दयनीय झाल्याने आता विरोधकांनी या मुद्दयावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या घराची अवस्था पाहिल्यास भिंतीला सर्वबाजूंनी तडे गेले आहेत. याठिकाणी ज्या काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या त्यांची चोरी झाली आहे. काही वेळा उर्दू घरामध्ये काही गैरप्रकार घडले आहेत असा देखील आरोप स्थानिकांनी केला आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उर्दू इमारतीचा घुमटाची देखील अवस्था दयनीय आहे. या उर्दुघरात उर्दू भाषेचं संवर्धन करण्यात येईल असं उदघाटनाला आलेल्या मलिकांनी म्हटलं होतं. मात्र या उर्दू घरात भाषेचं संवर्धन होण्याजागी बोगस काम कसं असतं असं दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला गेला आहे असं वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
गोव्यात काँग्रेसची महाविकास आघाडीतून एक्झिट? खासदार संजय राऊतांनी सांगितलं नकाराच कारण
उर्दूला कुख्यात करण्याचं काम आघाडी सरकारकडून करण्यात आलं आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. या सभागृहात वाचनालय, कार्यालय, उर्दू मुशायरा, उर्दू ग्रंथसाहित्यालाय, विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या या उर्दू घरात काढण्यात आलं होतं. मात्र ५ महिन्यांमध्येच उर्दू घराचं प्लास्टर ढासळल्यानं आता याच्या कामाला धोकादायक काम असं संबोधण्यात आलं आहे.
Read also:
- यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते
- गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
- गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
- खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !
- कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन