मुंबई : गेल्या ६२ दिवसांपासून सुरू असलेल्या संपाला एसटी कर्मचाऱ्यांकडून दुखवटा असं नाव देण्यात आलं आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं, तसंच एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे. मात्र, पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिला आहे.
भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला पदाचा राजीनामा
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केलं होतं की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणलं. शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असा इशारा अॅड. सदावर्ते यांनी पवार आणि परबांना दिलाय.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सदावर्ते म्हणाले, ‘आमच्याकडे एक पद्धत आहे की, आयोगाचे लोक जेलमध्ये विचारायला येतात की कुणाची काही तक्रार आहे का? तसं एका पाठोपाठ एक ज्या युनियनकडे माणसं नाहीत त्यांना संधी देण्यात आली. ते युनियनचे लोक आधी पवारांकडे पाहत होते आणि नंतर म्हणत होते कामगारांनी आता कामावर आलं पाहिजे. हा शरद पवारांचा वाढदिवस किंवा एखादी शोकसभा वाटत होती’, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
Read also:
- गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
- गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप
- खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !
- कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
- गोव्यात काँग्रेसची महाविकास आघाडीतून एक्झिट? खासदार संजय राऊतांनी सांगितलं नकाराच कारण