मुंबई : उत्तरप्रदेश, गोवा या राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तरप्रदेशात सत्तेत असणाऱ्या भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना देखील गोव्याच्या विधानसभेत आपले नशीब आजमावणार आहेत. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती.
राज्यातील पहिल्या उर्दू घराची ५ महिन्यांतच दयनीय अवस्था; चव्हाणांनी जनतेच्या ८ कोटींवर पाणी फेरले?
आता उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी थेट राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला जो धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी तर तयारी करत नाही ना ? असा सवाल अनेकांनी विचारला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
मला नेतृत्व नको, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वानी एकत्र येऊन पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत,’असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल सायंकाळी झालेल्या पत्रकारपरिषदेत जाहीर केले आहे.
“पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक काल सायंकाळी मुंबईत झाली. या बैठकीत महामंडळ, महाराष्ट्रातील पक्षाचे संघटन आणि इतर राज्यातील निवडणुका या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मलिक यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाबाबत मलिक म्हणाले की, ज्योतिष शास्त्र आमच्याकडे नाही. पोपटच्या माध्यमातून चिठ्ठी काढणे, भविष्यवाणी करणे, हे काम अमित शहा आणि नरेंद्र मोदी करत होते.
Read also:
- शरद पवार पंतप्रधान कधी होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर कधी पडणार? हेही सांगा – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे? पवारांच्या बैठकीवर भाजप नेत्याचा टोला
- युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे