मुंबई : उत्तरप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तरप्रदेशात सत्तेत असणाऱ्या भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना देखील गोव्याच्या विधानसभेत आपले नशीब आजमावणार आहेत. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती.
गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
यावरून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. आपल्या ट्वीट मध्ये पाटील म्हणाले, ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे नेते संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? हे एकदा त्यांनी समोर येऊन सांगावे. उत्तरप्रदेशात निवडणूक होणार असून त्याबद्दल हे दावे करत आहेत इतपर्यंत ठीक आहे मात्र थेट छातीठोकपणे दावे करणे हे मनोरंजन आहे असा टोला चंद्रकांत पाटलांनी मारला आहे.
या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री @OfficeofUT घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
जर संजय राऊत आणि शरद पवार या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्यचे सांगावे. संजय राऊत यांनी सांगावे की शरद पवार पंतप्रधान कधी होतील ? आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर कधी पडतील ? असं आव्हान देखील चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला या सरकारमधील गोंधळाचा नाहक त्रास भोगावा लागत आहे, परंतु सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेत असून सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या कानी पोहोचलाच नाही. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
महाविकास आघाडी सरकार असं नाव जरी असलं तरी प्रत्यक्षात महाभकास असं हे सरकार आहे. दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध लागू झाले असताना जनता यांना ओरडून ओरडून सांगत आहे की आता निर्बंध लावू नका. मात्र हे भकास जनतेचं न ऐकता स्वतःच खरं करण्यात ताकद लावत आहे. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे, असेही पाटील म्हणाले.
Read also:
- मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे? पवारांच्या बैठकीवर भाजप नेत्याचा टोला
- युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”