मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोनो रूग्णांच्या संख्या कमी नोंदविण्यात आली असून घटत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज 11, 647 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 1,00,523 सक्रिय रूग्ण आहेत.
शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नसणार; कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रवक्ते नवाब मलिकांची घोषणा
मुंबईत आज 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर नोंदविण्यात आला आहे. मुंबईत आज दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 413 इतकी झाली आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात मुंबईत 20 हजारांच्या पुढे नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत होती, त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, दोन दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांची संख्या घटल्याने नागरिकांसह प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे, असे म्हणता येईल.
COVID19 | Mumbai reports 11,647 fresh cases & 2 deaths today; Active cases at 1,00,523 pic.twitter.com/tKe8cvHzsu
— ANI (@ANI) January 11, 2022
गेल्या २४ तासात देशात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ६९ हजार ९५९ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे चिंता व्यक्त केली जात असताना त्याच्याही नव्या रुग्णसंख्येचा वेग सध्या मंदावला आहे. गेल्या दोन दिवसात ५०० च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसभरात सापडत आहेत. काल ४ हजार रुग्णांचा टप्पा पार केल्यानंतर आज एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ४ हजार ४६१ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १०.६४ टक्के इतका आहे.
Read also:
- राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
- “फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला”; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
- प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव; भाजप नेते आवाज उठवणार?
- “मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र
- शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; शशिकांत शिंदेंचे शिवसेना आमदाराला प्रत्यूत्तर