पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळावे, या हेतूने लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने IAS अधिकारी योगेश पाटील यांच्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याच्या बालेवाडी परिसरातील रॉयल रनभूमी मल्टीस्पोर्ट्स टर्फ येथे गुरूवारी (दि. २१) शिबीर पार पडले.
माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
या शिबिराला 300 हुन अधिक तरुण व त्यांचे पालक उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे अचूक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
आयएएस योगेश पाटील यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या सारख्या उपस्थित मुलामुलींना भावी आयुष्यासाठी नक्कीच फायद्याचे आणि दिशादर्शक ठरेल यात शंका नाही, अशी भावना उपस्थित तरुणांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या वेळेस सतीश पाटील (DY.CEO) यांच्यासह लहु बालवडकर सोशल वेलफेअरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also :
- महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले…
- 100 कोटी लसीकरणाचा टप्पा हा ऐतिहासिक; देवेंद्र फडणवीसांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक
- मंत्रालय बंद असतानाही हसन मुश्रीफांनी जनतेचे १५ हजार कोटी लुटले; किरीट सोमय्यांचा आरोप
- रुपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चित्रा वाघ यांचा पहिल्यांदा विरोध आता शुभेच्छा
- जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये; अजित पवारांच्या बॅनरची चर्चा