मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. तर कॉंग्रेसच्या आमदारांना देखील बैठकीसाठी दिल्लीत बोलवले आहेत. तसेच शिवसेनेच्या आमदारांशी बैठक वर्षा या निवासस्थानी बोलवण्यात आली आहे. तर शरद पवार हे आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काॅंग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान, निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आतापर्यंत सुरतमधील हॉटेलमध्ये एकुण 26 आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना अपक्ष आमदारांची देखील साथ असून त्यांच्याकडे एकूण 35 आमदारांची साथ आहे. यामध्ये शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपुत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार त्याचबरोबर तानाजी सावंत देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती भाजपच्या गुजरातमधील नेत्यांनी सांगितले आहे.
आघाडीतील 21 मतं फुटली कोणी बाजी मारली, कोणाची रणनिती फेल ठरली
एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे बाहेर जे वातावरण निर्माण केलं जात आहे. त्यात काही तथ्य नसून त्याबाबत लवकर आम्ही सर्व आमदारांसोबत बैठक घेणार आहोत. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये जो पॅटर्न भाजपने राबविला आहे. तो महाराष्ट्रात होणार नाही. अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दहाव्या जागेसाठी लाड अन् जगताप यांच्यात लढत, पण गेम झाला तो चंद्रकांत हंडोरेंचा
दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी यावर आता प्रतिक्रिया दिल्या असून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. असं त्यांनी त्यात म्हटले आहे. त्यामुळे सरकार पडणार की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
Read also:
- “शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
- “एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे सर्व आमदार संपर्कात, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही”
- आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
- राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
- देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप