बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र आता मडकं फोडल्यानंतर बारामतीतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. माळेगाव येथील एका सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडके फोडले. सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे ते मडके फोडताना म्हणाले होते. त्यानंतर रोहित पवारांनी हा व्हिडीओ भरसभेत दाखवला. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर भाष्य केले.
रविराज तावरे यांनी मडकं फोडल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी भरसभेत दाखवला. त्यानंतर मडके कधी फोडले जाते ? लोक कशाची वाट पाहतात. असा सवालही त्यांनी केला. तर मडके कधी आणि का फोडले जाते, हे वेगळं सांगायला नको. मडके फोडणे आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे. अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडके असते. मृत्युचा संकेत मडक्यातून दिला जातो. बारामतीच्या सभेत जे घडले ते अघोरी विद्येतून घडले आहे. मडके कोणी फोडले, कशासाठी फोडले, यापेक्षा पुरोगामी शरद पवारसाहेब यांच्या बारामती परिसरात मडके फोडले गेले आहे. हे मडके फोडायला ज्याने सांगितले, त्याच्या मनालाच हे मडके का फोडले, हे माहित असेल. पण, जे झाले ते वाईटच झाले! असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी देखील संताप व्यक्त केला.
शरद पवार गटाने केलेल्या आरोपावर अजित पवारांनी देखील भरसभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, मडके फोडणार कोण आहे, हे मला माहिती नाही. तर आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर सडकून टिका केली. अजितदादांच्या आदेशानुसार विकासाच्या मुद्यावर आमचा प्रचार सुरू आहे. मात्र मटका फोडल्यावरून त्यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले. दुष्काळी भागातील महिलांच्या डोक्यावर हंडा असतो. आता विकासाच्या मार्गावरून जाताना कोरडा हंडा काय कामाचा. मग तो फोडलेला बरा. असा तावरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. मात्र अनेक मोठ्या सभा घेतल्यानंतर त्यांना सामान्य कार्यकर्त्याच्या या कृतीची दखल घ्यावी लागली असाही टोला त्यांनी लगावला.
शत्रूच्या बाबतीतही वाईट न चिंतन्याची आपली संस्कृती आहे, पण बारामतीत अजितदादांच्या #मलिदा_गँगचा सदस्य आणि लाभार्थी कार्यकर्त्यांकडून प्रचारात आदरणीय पवार साहेबांच्या नावाने राजरोसपणे मडकी फोडणं हा विकृत आणि घृणास्पद प्रकार सुरूय. पराभूत मानसिकतेतून हा प्रकार सुरू असून हे कुणाच्या… pic.twitter.com/TVMJJQrOME
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 5, 2024
मडके कधी आणि का फोडले जाते, हे वेगळं सांगायला नको. मडके फोडणे आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे. अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडके असते. मृत्युचा संकेत मडक्यातून दिला जातो. बारामतीच्या सभेत जे घडले ते अघोरी विद्येतून घडले आहे. मडके कोणी फोडले, कशासाठी फोडले,…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“भाजपला महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणे कठीण?” सर्व्हेक्षणात आली माहिती समोर
हेही वाचा..भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग, आढळराव पाटलांचे भोसरीत उत्साहात स्वागत
हेही वाचा…“सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार”, मोहोळांनी दिला शब्द
हेही वाचा..“टिपू सुलतानचे स्मारक होवू देणार नाही”,भाजप शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला इशारा
हेही वाचा..श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मावळमध्ये भाजपचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार