गावपातळीवर विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी पूर्णा तालुक्यास देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या ध्येयधोरणावर कडाडून टीका करताना त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खुपसून समाचार घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभुत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच आगामी सर्वंच निवडणुका ह्या शिवसेना लढवणार असून परभणी जिल्ह्याचा संपर्कप्रमुख या नात्याने सर्व शिवसैनिकांना पाठबळ देणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले, परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यात असून ग्रामीण भागात शिवसेनेचे विचार मागील 40 वर्षांपासून घराघरात गेले असल्याने परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. यावेळी पूर्णा तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन साहेबराव कल्याणकर तर आभार शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांनी मानले.
यावेळी शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्र शासनाच्या ध्येयधोरणावर कडाडून टीका करताना त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खुपसून समाचार घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभुत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच आगामी सर्वंच निवडणुका हृया शिवसेना लढवणार असुन परभणी जिल्हा संपर्कप्रमुख या नात्याने सर्व शिवसैनिकांना पाठबळ देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी यांनी सांगितले.
Read Also
“सरकारने सुरक्षा दिली नाही,तरी आम्ही सदैव तत्पर” राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र रक्षक’ तयार