सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणामध्ये संदीप सिंह आणि त्याचे आमली पदार्थांविषयी संबंध पुढे आलेले असताना एकूणच सिनेसृष्टीमधील कलाकार आणि ड्रग यांची चर्चा सुरु झालेली असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरवरून फक्त रणवीर आणि रणबीर का ? आदित्य ठाकरेंनी देखील ड्रग टेस्ट स्वतःहून करावी असे म्हंटले आहे.
मुळात अभिनेत्री कंगना रानौत हिने रणबीर आणि रणवीर तसेच अयान मुखर्जी,विकी कौशल या अभिनेत्यांनी त्यांची रक्त चाचणी करावी कारण ते ड्रग घेतात अशी चर्चा आहे आणि त्यांनी ही चर्चा चाचणी करून खोटी ठरवावी असे कंगनाने म्हंटले होते.
त्यानंतर आता निलेश राणे यांनी फक्त रणबीर आणि रणवीर का तर आदित्य ठाकरे यांनी देखील रँडम ड्रग टेस्ट करायला हवी कारण ते देखील बॉलिवूड सिनेसृष्टीच्या खूप जवळ असतात. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये ठाकरे या शब्दाचे स्पेलिंग वेगळे लिहिल्याचे देखील दिसून येते.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
काय म्हणाली होती कंगना नेमकं
I request Ranveer Singh, Ranbir Kapoor, Ayan Mukerji, Vicky Kaushik to give their blood samples for drug test, there are rumours that they are cocaine addicts, I want them to bust these rumours, these young men can inspire millions if they present clean samples @PMOIndia 🙏 https://t.co/L9A7AeVqFr
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 2, 2020