नाशिक : राज्यात औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपुर आणि नाशिक याठिकाणी निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये नाशिकची पदवीधर मतदार संघाची निवडणुक अपक्ष आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांच्यामुळे चर्चेत आली होती. यातच आता भाजपने या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजपचा धुव्वा उडणार…! सर्व्हे काय म्हणतो? आघाडीला 34 तर..
ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी बंडाळी केल्याने राज्यात महाविकास आघाडी अडचणीत आली. त्यानंतर शिवसेनेपुरस्कृत उमेदवार शुंभागी पाटील यांना आघाडीने पाठिंबा दिला. मात्र सत्यजीत तांबे यांना भाजपने अद्यापही पाठिंबा जाहीर केला नव्हता. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथील जिल्ह्याध्यांशी फोनवरून चर्चा झाली असून भाजप सत्यजीत तांबे यांना आपला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
“तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळें काॅंग्रसेकडून धक्क्यावर धक्के, कार्यकारीणीच बरखास्त”
काॅंग्रेसविरोधात बंडाळी केल्याने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर सत्यजीत तांबे यांना ज्यांनी पाठिंबा दिला. त्याच्यावर काॅंग्रेसने निलंबणाची कारवाई केली. यातच नगर जिल्ह्यात एका रात्रीत निवडणुक जिंकण्याची क्षमता आहे. त्यामुळे उद्या जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाव आलं. तर एका रात्रीत आम्ही चित्र बदलून दाखवू. असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
“भाजप अन् शिवसेना युती बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केली”
दरम्यान, सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबणाची कारवाई केल्यानंतरही त्यांना काॅंग्रेसच्या काही नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यावरही काॅंग्रेसने कारवाई केली. यातच आता जर सत्यजीत तांबे यांना जर भाजपने आपला पाठिंबा दिला. तर महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवित असलेल्या शुंभागी पाटील यांना ही निवडणुक चांगलीच जोरदार होईल असं चित्र सध्या आहे.
Read also
- राज्यातील नारीशक्तीची ताकद महेश लांडगे यांच्या पाठिशी : चित्रा वाघ – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘‘इंद्रायणी थडी’’ ला भेट
- “शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे प्रमुख स्तंभ, आदर ठेऊन बोला”,राऊतांनी आंबेडकरांना सुनावलं
- “सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे कुठेच दिसत नाही…!” लोकांची पसंती नेमकी कुणाला?
- “ज्या बापाला आपण बाप मानलाय, त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन”
- “राज्यातील सर्व मातृशक्ती महेश दादाच्या पाठीमागे उभी”; ‘इंद्रायणी थडी’त चित्रा वाघ यांचं वक्तव्य