पुणे : बचत गटासारखी संकल्पना ज्यातून चुल आणि मुलच्या बाहेर येऊन राज्यातील महिला सक्षम होतांना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याला बळ देण्याचं काम इंद्रायणी थडी यात्रेमधून आमदार महेश लांडगे या भावांनी केलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मातृशक्ती महेश लांडगे यांना कोटी कोटी नमन करत आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नारी शक्तीचा सन्मान केला जात आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडीच्या यात्रेची सुरूवात झाली. त्याचा मला आनंद होत आहे. असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. भोसरी याठिकाणी आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीच्या प्रजासत्ताक दिनी नारी शक्तीचाही सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी काम करीत राहिन”; नवनीत राणा
इंद्रयणी थडीच्या कार्यक्रमात दहा लाखांपेक्षा अधिक लोकं येऊन गेली आहेत, तसेच येणाऱ्या दिवसातही येणार आहेत. तसेच देशातील तसेच राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम करीत आहे. त्यामुळेच या मातृशक्तीचं कौतुक, गौरव करण्याचे काम महेश लांडगे करीत आहेत. असंही त्या म्हणाल्या.
प्रकाश आंबेडकरांनी शुद्धवर येऊन बोललं तर बरं होईल…! विद्या चव्हाणांचा आंबेडकरांना सुचक इशारा
तसेच ग्रामीण भागातील महिला शहरात येतात. तेव्हा त्यांनी बनवलेल्या धपाटे, भाकरी, किंवा इतर चमचमीत पदार्थ शहारातील लोकं आवडीनं खातात. याचं आनंद होतोय. आताच्या मुलांना मॉलशिवाय काहीच माहिती नाही. पंरतु याठिकाणी जत्रा भरवून याठिकाणी लहान मुलंही आनंद घेतांना दिसत आहेत. तसेच आज संस्कृती जपण्याचं काम देखील महेश लांडगे शिवांजलीच्या माध्यमातून करत आहेत. असही त्या म्हणाल्या.
Read also
- लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजपचा धुव्वा उडणार…! सर्व्हे काय म्हणतो? आघाडीला 34 तर..
- “तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळें काॅंग्रसेकडून धक्क्यावर धक्के, कार्यकारीणीच बरखास्त”
- “भाजप अन् शिवसेना युती बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केली”
- “सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा, ताईंना असा आजार होऊ नये”
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोदींचा माणुस म्हणणं अयोग्य”