मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस युतीत भाजपकडून एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषीत झाल्याने अनेकांना त्याचं आश्चर्य वाटलं. यातच एकनाथ शिंदेंचं नाव याकाळात प्रचंड प्रमाणात चर्चेत आलं. परंतु यातच आता एका सर्व्हेनुसार देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नाव पहिल्या दहामध्येही नसून लोकांनी त्यांना नाकारल्याचं दिसत आहेत.
“सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा, ताईंना असा आजार होऊ नये”
हिंदुत्वासाठी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही. आमचं सरकार सर्वसामान्यांसाठी असून महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. असं वारंवार एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील लोकांना आपल्या भाषणांमधून सांगत राहिले. परंतु शिवसेनेशी केलेली गद्दारी अदयापही लोकांना आवडलेली नाही. त्यामुले लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत शिंदेंचं नाव पहिल्या दहामध्ये नसल्याचं दिसून येत आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोदींचा माणुस म्हणणं अयोग्य”
इंडीया डुडे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडीशा राज्यातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यांना लोकांची 73.02 टक्के पसंती मिळाली आहे. त्याखालोखाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना 69.02 टक्के लोकांनी आपली पसंती दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर हेमंत बिस्वा सरमा यांना स्थान देण्यात आले असून त्यांना 68. 03 टक्के पसंती दिली आहे.
“शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी काम करीत राहिन”; नवनीत राणा
चौथ्या क्रमांकावर भुपेश बघेल ( छत्तीसगड ), शिवराज सिंह चौहान ( मध्यप्रदेश ),पुष्कर धामी (उत्तराखंड ) योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश ) एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू), भूपेंद्र पटेल (गुजरात) वाय. एस. मोहन रेड्डी ( आंध्रप्रदेश) यांना स्थान देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी फक्त 02.02 टक्के पसंती दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी शुद्धवर येऊन बोललं तर बरं होईल…! विद्या चव्हाणांचा आंबेडकरांना सुचक इशारा
इंडीया डुडे – C वोटरने केलेल्य सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात एनडीए म्हणजे भाजप, शिंदे गट आणि आठवले गट यांना फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीए ला तब्बल 34 जागा मिळू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या बंडाळी मोठा फटका भाजप आणि शिंदे गटाला बसण्याचा अंदाज आहे.
Read also
- “ज्या बापाला आपण बाप मानलाय, त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन”
- “राज्यातील सर्व मातृशक्ती महेश दादाच्या पाठीमागे उभी”; ‘इंद्रायणी थडी’त चित्रा वाघ यांचं वक्तव्य
- लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजपचा धुव्वा उडणार…! सर्व्हे काय म्हणतो? आघाडीला 34 तर..
- “तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळें काॅंग्रसेकडून धक्क्यावर धक्के, कार्यकारीणीच बरखास्त”
- “भाजप अन् शिवसेना युती बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केली”