राजस्थानमध्ये माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सांगितले जात आहे की तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक राहिली. अशात सचिन पायलट यांना पुन्हा घरवापसी करत पक्षात रुजू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रियांका आणि राहुल यांच्या भेटीनंतर सचिन पायलट राग सोडून पुन्हा पार्टीत सहभागी होतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यापूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती, तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासोबत अनेकदा फोनवर चर्चा केली आणि प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला. 14 ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याची संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात सचिन पायलट पुन्हा पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात खरच पायलट काँग्रेसमध्ये पुन्हा जागा बनवू शकतात के हे पाहणे औत्सुक्याचे आहे.