IMPIMP
After the arrest of five Bangladeshis, Mahesh Landge is aggressive After the arrest of five Bangladeshis, Mahesh Landge is aggressive

“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही धडक करावाई केली. त्याबद्दल भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.

हेही वाचा..पुणे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाच्या आमदाराचं नाव समोर, आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत 

दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असली, तरी शहरातील काही भागांमध्ये अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्टच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून घुसखोर वास्तव्य करीत आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अशा घुसखोरांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा  देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा..“भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला…”, भुजबळांच्या ८० ते ९० जागांच्या दाव्यांवर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले.. 

दरम्यान, राज्य सरकारचं आगामी विधिमंडळाचं अधिवेशन येत्या काही महिन्यात होणार आहे. या अधिवेशनात बांगलादेशी घुसखोर व पिंपरी-चिंचवडची सुरक्षा’’ या संवदेनशील मुद्यावर प्रभावीपणे भूमिका मांडणार असल्याचं मत देखील महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी 

हेही वाचा…“आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही, विधान परिषदनिवडणुक लढणार “, मनसेने महायुतीला दिला कडक इशारा

हेही वाचा…गोलमाल है भाईस सब गोलमाल है..! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्षा 

हेही वाचा..“मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन”, अटक केलेल्या ससूनच्या डॉ. तावरेचा गर्भित इशारा