मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जून रोजी लागणार आहे. मात्र त्याआधीच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलं आहे. अशातच मुंबईत आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला ८० जागा मिळाल्यास भाजप अन् शिंदेंना किती जागा मिळणार ? याची जोरदार चर्चा सुरू झालीय. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”
विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या? यासंदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील. योग्य तो फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा पुर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
सत्तेत सहभागी होतांना भाजपने विधानसभेला ८० ते ९० जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळायलाच हवा. विधानसभेला लोकसभेसारखी खटपट व्हायला नको. असं भुजबळांनी म्हटलं आहे. तसेच आधीच सांगून द्यायलं हवं की, आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत. हे आधीच आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५० ते ६० निवडून येणार. ५० च घ्यायच्या अन्. मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही खाली येणार असेही भुजबळांनी सांगितलं.
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
छगन भुजबळ यांच्या विधानानुसार विधानसभेला अजित पवार गटाला ८० ते ९० जागा मिळाल्यास शिंदे गटाला देखील तितक्याच बहुधा त्यापेक्षा जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे २८८ पैकी १०५ आमदार आहेत. यानुसार या निवडणुकीत भाजप १५० जागा लढवू शकतात. तर शिंदे गटाला देखील अजित पवारांच्या एवढ्याच एव्हाना दहा पंधरा जागा देण्याची शक्यता आहे.
यातच महायुतीत अजूनही काही घटक पक्ष आहेत. त्यांचा देखील भाजपला विचार करावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील असाच गोंधळ बघायला मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं गणितं राज्यात वरिष्ठ नेते कसं मांडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये, अन् पराभावाने खचूनही जाऊ नका”
हेही वाचा…“मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या,” पुणे अपघात प्रकरणी अजित पवार असं का म्हणाले ?
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?