मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी शरद पवार गटाला राम राम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समोर आले आहे. यावरून आता राज्यापाठोपाठ देशपातळीवर देखील शरद पवारांना धक्का बसलाय. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठा दावा केलाय.
धीरज शर्मा यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत अजित पवार गटात प्रवेश केला. यावर धीरज शर्मा यांच्या प्रवेशाने बऱ्याच गोष्टी अधोरेखित केल्या आणि प्रश्नही उपस्थित झाले. तुतारी गटातील दोन गुंडे ज्यांनी अख्ख्या पक्षाची वाट लावली. यांच्याच गुंडागर्दीमुळे पक्ष संपत गेला आहे. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
दरम्यान, अजितदादांनी निर्णयासोबत हळूहळू लवकरच युवा पिढी संपुर्ण देशात उभी राहिल. असं म्हणत लवकरच धमाका नं. २ होणार असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”