पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर संपुर्ण महाराष्ट्र हळहळून गेला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर विरोधकांकडून देखील हे प्रकरण जोरदारपणे लावून धरलं जात आहे. यातच कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने यावर वेगवेगळी भूमिका घेतांना दिसत आहे. अशातच आता या प्रकरणाबाबत युवक कॉंग्रेसच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुली निंबध स्पर्धा घेण्यात आली आहे.
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”
सुरूवातीला आरोपी अल्पवयीन असल्याने बाल सुधार कारागृहाने आरोपीला पंधरा तासात जामीन मंजूर झाला केला. यामध्ये काही अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये आरोपीला ३०० शब्दात निंबध लावण्यास सांगितले होते. तसेच ट्रॉफिक हवालदारसोबत पंधरा दिवस ट्रॉफिकचे धडे घेण्यास सांगितले. त्यावरून विरोधकांनी पोलिस तसेच प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. यातच आता कॉंग्रेसकडून पोलिस तसेच सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी निंबध स्पर्धा घेण्यात आलीय.
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप
पुण्यात युवक कॉंग्रेसच्या वतीने ही निंबध स्पर्धा घेण्यात आली आहे. यामध्ये माझी आवडती कार ( पार्शे, फरारी, मर्सिडिज, की इतर ), दारूचे दुष्परिणाम, नियम पाळा, अपघात टाळा, ( अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे ) , आजची तरूण पिढी, अन् व्यसनधीनता, माझा बाप बिल्डर असता तर ..?,रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे ?, मी पोलिस अधिकारी झालो तर ..? भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का ?, अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण ?, माझ्या स्वप्नातील पुणे शहर, असंच असावं माझं पुणे शहर या विषयावर निंबध लिहिण्यास सांगण्यात आले आहेत.
तसेच यासाठी प्रथम बक्षीस म्हणून ११,१११, द्वितीय बक्षीस७,७७७, तृतीय बक्षीस ५,५५५ तर उत्तेजनार्थ १००० प्रत्येकी देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. याचसह रविवारी २६, ०५, २०२४ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. तर बक्षीस वितरण कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या