मुंबई : दोन दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पाण्याच्या टंचाईबाबत एक बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत महानगरपालिकेसंदर्भात चर्चा झाली. यातच आता दोन दिवसानंतर आपत्तीसंदर्भात बैठक घेणार आहे. पुर्व मान्सुनपुर्वी आपल्याला सगळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यात इतकं काम असल्याने मी लंडनला जाऊ शकत नाही. असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला होता. त्यावर ठाकरे गटातील आमदार सुनील राऊत यांनी शिंदेंवर पलटवार केला. त्यात अजून शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं.
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई
लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं. तिथे मराठी हिंदी मध्ये बोलणार का ? ते शक्य आहे का ? अन् ज्याला लंडनला पोहचता येत नाही तो बोलतो. त्यात नाचता येईन अंगन वाकडं असं म्हणत सुनील राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं. यात त्यांनी जावं लंडनला परंतु त्यांना माहिती आहे की, लंडनला गेल्यावर महाराष्ट्रातील ४० गद्दारांमध्ये हालचल निर्माण होईल. आणि कुठेतरी फाटाफुट होईल. असा टोलाही त्यांनी लगावला.
यांना लोकांशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही. त्या डोंबिवलीमध्ये आग लागून लोक मेलीत. परंतु त्यांनी तिथं राहून वेळ मिळाला नाही. परंतु यांना लंडनला जायला वेळ आहे. अन् आम्हाला इंग्लिश येते की नाही, ते माहिती नाही, पण तिथे बाया नाचवायच्या नाहीत .आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची काळजी आहे. कोण लंडनला जातंय. तिकडेच्या बाया गोव्यात कोणत्या नेत्यासोबत होत्या. ते बोलायला लावू नका. इंग्लिश आम्हाला येत नाही आमच्या मायबोली मराठीची अभिमान आहे. असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप