पुणे : कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपुर्ण यंत्रणांच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. आरोपी मुलगा वेदांत अग्रवालला वाचविण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांची मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र आता धनिकपुत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससुनमधील वरिष्ठ डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने मद्दप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रूग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्त्याच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली आहे. “पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ‘ आहे? आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का?” असा सवाल देखील त्यांनी केलाय.
ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले. पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केलीय.
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते. तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येतील. असा इशारा कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलाय.
पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ‘ आहे?
आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे
आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून… pic.twitter.com/x5b41fhfIu
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 27, 2024
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे.
ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”