मुंबई : विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. येत्या २६ जून रोजी राज्यातील चार जागांसाठी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जूलै रोजी लागण्याची शक्यता आहे. यातच आता कोकण विभागात भाजप विरूद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार ही उमेदवारी निश्चित झाल्याचं समोर आलेल्या पत्रामध्ये नमुद करण्यात आलं आहे. या मतदारसंघातून भाजप पक्षाचे निरंजन डावखरे यांची दावेदारी आत्तापर्यंत निश्चित मानली जात होती.
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
तसेच भाजपकडून निरंजन डावखरे यांची उमेदवारीची लवकरच घोषणा केली जाईल, असंही बोललं जात होतं. मात्र, त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीकरीता मनसे महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भाजप पक्षाची नेमकी भूमिका काय असेल ? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल