पुणे : पुण्याचा बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांचा बळी घेतला. या अपघातातील बिल्डरच्या प्रतापी मुलाला वाचविण्यासाठी पोलिसच नाहीत र ससूनची यंत्रणालाही कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोपी वेदांत याच्या ब्लड सॅम्लपमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ससुनच्या दोन डॉक्टरांना आता पोलिसांनी अटक केली आहे. यातच याप्रकरणात एकाच वेळी आरोपी मुलगा, त्याचा बाप आणि आजोबा तुरूंगात आहेत. यातच आता त्यांचा आणखी पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
बिल्डर विशाल अग्रवाल याच्यासह आजोबा सुरेंद्र कुमार याला याप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे अनेक जुने प्रकरण समोर येत आहेत. यातच एका प्रकरणात शिवसेना नेते अजय भोसले यांनी अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात पहिली तक्रार दाखल केली आहे. यातच आता दुसरी तक्रार देखील दाखल करण्यात आली असून अपघात त्यानंतर या दोन केसेसमुळे अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
अगरवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरे तक्रारदार दत्तात्रेय कातोरे हे पुढे आले असून कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. तक्रारदार कातोरे हे अग्रवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे २००० ते २००५ दरम्यान खोदाईचे काम करत होते. या कामाचे अगरवाल कुटूंबाकडे ८४ लाख ५० हजार रूपये बाकी होते.
दरम्यान, पैसे मिळत नसल्याने तक्रारदाराचा मुलगा शशी कातोरे यांनी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली आहे. मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रेय कातोरे पोलिसांना आज तक्रा देणार आहे. यापुर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान